जळगावातील माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त ; ललित कोल्हेंसह आठ जण ताब्यात

सप्टेंबर 28, 2025 8:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२५ । जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या एल के फॉर्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्भस्त केला आहे. धक्कादायक म्हणजे हा फॉर्म हाऊस माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा असून याप्रकरणी पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे सह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याकारवाईने जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे

farm house

याबाबत असे की, जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या एल के फॉर्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटर सुरू होतं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणात पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून, अटकेची कारवाई सुरू आहे. माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा असलेल्या फॉर्म हाऊसवरच हे कॉल सेंटर सुरू होतं. तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील तरुण या ठिकाणी काम करत होते. या तरुणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांचे नाव सांगून लोकांची फसवणूक सुरू असल्याचं समोर आलं आहे. 20 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now