जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । जळगावात बीएचआरचे पथक पोहचताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिग्गजांची धरपकड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून आ.राजुमामा भोळे हे देखील जिल्हापेठ पोलिसात पोहचले आहे.
जळगाव शहरातील हॉटेल आणि सोनार व्यवसायिक भागवत भंगाळे यांना चौकशीकामी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना जिल्हापेठ पोलिसात आणण्यात आले आहे. भागवत भंगाळे यांना भेटण्यासाठी अनेकांची पोलीस ठाण्यासमोर गर्दी झाली असून त्यांचे नातेवाईक असलेले आ.राजूमामा भोळे हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. आमदारांनी पथकाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ते अद्याप त्याठिकाणी थांबून आहेत.
हे देखील वाचा:
Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात
Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात