अमळनेरात दरोड्याची धक्कादायक घटना ; घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोन्यासह कॅश लुटली

सप्टेंबर 26, 2025 2:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून यातच अमळनेर शहरातून दरोड्याची धक्कादायक घटना समोर आलीय. चार अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे ६ तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख लुटल्याची धक्कादायक घटना अमळनेर शहरातील अयोध्यानगर, बंगाली फाईल येथे घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chori

या घटनेबाबत असे की, अमळने शहरातील अयोध्यानगर, बंगाली फाईल येथे दीपक पुंडलिक पाटील हे परिवारासह वास्तव्यास असून ते रेल्वेत तांत्रिक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान २५ सप्टेंबर रोजी ५ वाजता कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत चार अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तीला चाकू लावला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातून ६ तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख लुटले.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, उदय बोरसे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, विनोद सोनवणे आणि सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला असून, पंचनामा पूर्ण करत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. मात्र या घटनेने परिसरातील नागरिकनांमध्ये भीतीचे वातावरण आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now