जळगावमध्ये 29 रोजी 106.4 FM प्रस्तुत ‘दांडिया धमाल’ सोहळा

सप्टेंबर 26, 2025 1:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नवरात्र उत्सवाला उत्साहाची नवी उधळण देण्यासाठी रेडिओ ऑरेंज (धमाल) 106.4 एफएम तर्फे ‘दांडिया धमाल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जल्लोषमय सोहळा दि. २९ रोजी यश लॉन्स, जळगाव येथे रंगणार आहे.

dandiya dhamal2

कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून कलर्स मराठी, दैनिक पुण्यनगरी व कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि. सहभागी झाले आहेत. तसेच, ज्वेलरी पार्टनर – पातोंडेकर ज्वेलर्स आणि व्हेन्यू पार्टनर – यश लॉन्स व हॉल आहेत. या रंगारंग दांडिया नाईटचे असोशिएट पार्टनर्स म्हणून श्री व्यकंटेश रिफायनरिज लि., चौधरी टोयोटो, भास्कर मसाले, एस के ऑईल, श्री किचन ट्रॉली, सिका मोटार्स व शोभाराम फाऊंडेशन या नामांकित संस्थांचा सहभाग आहे.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक दांडिया व गरब्याचे सूर, आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी वेशभूषा आणि उत्साहाने भारलेले वातावरण जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. तरुणाईसह सर्व वयोगटांसाठी हा कार्यक्रम खास आकर्षणाचा ठरणार असून नवरात्रीतील ही दांडिया धमाल जळगावच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार आहे. अधिक माहिती साठी किरण परदेशी – 80104 99625 व आर जे मयूर – 89592 47964 यांना संपर्क साधावा.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

आकर्षक डेकोरेशन, रोषणाई व आधुनिक साउंड सिस्टीम
पारंपरिक वेशभूषेला विशेष प्रोत्साहन
बेस्ट ड्रेस व बेस्ट डान्सरसाठी बक्षिसे
फूड कोर्टमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now