दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास; जळगावमार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी धावणार 12 विशेष गाड्या..

सप्टेंबर 20, 2025 8:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची बातमी आहे. आगामी दसरा-दिवाळी सणांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी १२ रेल्वे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सणाच्या काळात जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

irs

नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे लोक सणासुदीच्या काळात आपापल्या गावी जातात. त्यामुळे सणाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएसएमटी मुंबई – गोरखपूर मुंबई स्पेशल ट्रेन

गाडी क्रमांक ०९०७९ सीएसएमटी मुंबई – गोरखपूर स्पेशल २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत रोज रात्री १०.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल. ती जळगाव स्थानकावर पहाटे ५ वाजून १८ मिनिटाने तर भुसावळला ५ वाजून ५० मिनिटाने पोहोचेल. यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गोरखपूरला पोहोचेल.
०१०८० गोरखपूर-सीएसएमटी मुंबई २८ सप्टेंबर ते २ डिसेंबरपर्यंत रोज दुपारी २.३० वाजता गोरखपूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी जळगावात दुपारी ३.३० वाजता थांबा घेईल. तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता मुंबईला पोहोचेल.

पुणे – गोरखपूर पुणे

०९४१५ पुणे – गोरखपूर विशेष रेल्वे २७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी ६.५० वाजता पुण्याहून निघेल. ती दुपारी ४ वाजता भुसावळला थांबा घेईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजता गोरखपूरला पोहोचेल.
०९४१६ गोरखपूर – पुणे विशेष ट्रेन २८ सप्टेंबर ते ०१ डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी ५.३० वाजता गोरखपूरहून निघेल, दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता भुसावळात थांबा घेईल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०३.१५ वाजता पुण्यात पोहोचेल.

नागपूर-पुणे- नागपूर

०१२०९ नागपूर-पुणे विशेष रेल्वे २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी नागपूरहून सायंकाळी ७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २.२० वाजता भुसावळात तर सकाळी ११.२५ वाजता पुण्यात पोहोचेल.
०१२१० पुणे-नागपूर ही विशेष गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी पुण्याहून दुपारी ३.५० वाजेच्या सुमारास निघेल, रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावात थांबा घेईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

एलटीटी-दानापूर-एलटीटी

०११४३ एलटीटी-दानापूर विशेष २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी १०.३० वाजता एलटीटी मुंबई येथून निघेल, सायंकाळी ५.१५ वाजता भुसावळात दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहोचेल.
०११४४ दानापूर-एलटीटी डेली स्पेशल २६ सप्टेंबर ते ०१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री ९.३० वाजता दानापूरहून निघेल, दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता भुसावळात येईल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.

एलटीटी-नागपूर-एलटीटी

०२१३९ एलटीटी-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल २५ सप्टेंबर ते २७नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी एलटीटी, मुंबई येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल, सकाळी ७.२८ वाजता जळगावात थांबा घेईल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
०२१४० नागपूर-एलटीटी स्पेशल २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी १.३० वाजता निघेल, सायंकाळी ७.५० वाजता जळगावात थांबा घेईल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता एलटीटी, मुंबई येथे पोहोचेल.

पुणे – दानापूर-पुणे

०१४४९ पुणे – दानापूर विशेष ट्रेन २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी ३.३० वाजता पुण्याहून निघेल व रात्री १२.४५ वाजता भुसावळात येईल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२ वाजता दानापूरला पोहोचेल.
०१४५० दानापूर-पुणे ही विशेष गाडी २७ सप्टेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दानापूरहून सकाळी ५.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता भुसावळात येईल, सायंकाळी ६.१५ वाजता पुण्यात पोहोचेल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now