अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आईसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सप्टेंबर 1, 2025 10:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आई, चुलत बहीण, मेहुणा, पती व प्रियकरासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात रावेर तालुक्यातील एका गावातील महिला तिच्या १५ वर्षीय मुलीला घेऊन जळगावला पुतणीकडे आली. नंतर मुलीचे चांगदेवच्या एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नानंतर पतीने संबंध ठेवण्यावरून मारहाण केली. म्हणून ती जळगावात चुलत बहिणीकडे निघून आली. त्यानंतर बहिणीच्या दिराने या अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढले. त्यामुळे तिने तिच्या प्रियकराशी संपर्क साधून त्याला जळगावात बोलवले.

प्रियकर या मुलीला कुसुंब्यात (ता. जळगाव) एका महिलेकडे घेऊन गेला. तेथे मुलगी व तिच्या प्रियकरात संबंध आले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्याने मुलीला घेऊन ती निंभोरा पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मुलीची आई, चुलत बहीण, चुलत मेहुणा, त्याचा भाऊ, मुलीचा पती, माम सासरे, मामसासु, प्रियकर, त्याला राहण्यासाठी मदत करणारी महिला अशा १० जणांविरुद्ध ३१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शनि पेठ पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now