केंद्राच्या ‘या’ योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा अव्वल !

ऑगस्ट 30, 2025 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारकडून राबविल्या जणाऱ्या एका योजनेमध्ये जळगाव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले. जनतेला विनामूल्य व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र शासनाने राबविलेल्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ अंतर्गत जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. या योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हा आरोग्य सेवांच्या कार्यक्षम अंमलबजावणीत राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श ठरला आहे.

jalgaon

आरोग्य योजनांमध्ये लाभार्थ्यांची अचूक आणि पारदर्शक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना आहे.

यामध्ये पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांपर्यतच्या मोफत उपचारांचा लाभ मिळतो. यामध्ये हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, उपचार, औषधे आणि फॉलोअप सेवा यांचा समावेश आहे.

योजनेद्वारे मिळणारे फायदे
आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना उच्च दर्जाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत, ग्रामीण भागातील लोकांनाही मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची संधी, योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्यस्थांशिवाय थेट रुग्णालयातून नोंदणी, गंभीर आजारांसाठी किफायतशीर व वेळीच उपचार मिळतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now