अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची कार्यकारिणी घोषित

ऑगस्ट 29, 2025 4:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर आयोजित छात्र सत्ता २०२५ जळगाव महानगर कार्यकारिणी घोषणा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात प्रा. डॉ. अमरदीप पाटील व कु. चिन्मय महाजन यांची वर्ष २०२५-२६ साठी जळगाव महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री म्हणून निवड करण्यात आली. छात्रसत्ता या विद्यार्थी संमेलनामध्ये निर्वाचन अधिकारी प्रा.डॉ. भूषण राजपूत यांनी महानगर अध्यक्ष व महानगर मंत्री यांची घोषणा केली. त्याचबरोबर उर्वरित जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप प्रदेश सहमंत्री वरूनराज नन्नवरे उपस्थित होते.

All India Students Council

कार्यक्रमादरम्यान महानगर सहमंत्री चिन्मय महाजन यांनी मंत्री प्रतिवेदन केले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे जळगाव महानगरातील अभाविपचे कार्य उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडले व २०२४-२५ ची कार्यकारिणी विसर्जित केली.

कार्यकारिणी घोषणा जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी अभाविपची आगामी दिशा मांडली. विद्यार्थी केवळ उद्याचे भविष्य नाही तर आजचे सक्रिय नागरिक देखील आहेत. याच विचाराने जळगाव महानगर कार्यकारनी पुढील वर्षभर कार्य करणार आहे.
अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे यांनी कार्यक्रम प्रसंगी परिषदेची मांडणी केली. यावेळी,”अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ‘ जहा जहा परिसर, वहा वहा परिषद’ हे ध्येय घेऊन ITI ते IIT असा प्रवास पूर्ण करीत आहे”असे म्हणाले.

उर्वरित जळगाव महानगर कार्यकारिणी

महानगर सहमंत्री – वरद पांढरकर पाटील शुभम भारी
कार्यालय मंत्री – मोहित सोनी
कोष प्रमुख – गणेश दुसाने
टी.एस.व्हि.के- संयोजक ऋषिकेश मोरखेड
सहसंयोजक – आर्यन भालशंकर
विधी कार्य संयोजक- स्नेहल चौधरी
विद्यार्थिनी कार्यप्रमुख – जानवी पाटील
सोशल मीडिया संयोजक – गणेश पाटील
एस.एफ.डी संयोजक – ऋषिकेश बोराळे
मेडिव्हिजन संयोजक – रोहित कलाने
मेडिविजन सहसंयोजक – तेजस सिंह नाईकवाडे ,स्नेहा केरेकर
जिज्ञासा संयोजक – गौरेश गावडे
साविष्कार संयोजक – अनिकेत वैद्य
महानगर कार्यकारिणी सदस्य हाप्रा डॉ भूषण राजपूत ,अजित केंद्रे ,ऋषिकेश केकान, वैष्णवी शितोळे,
वरूनराज नन्नवरे,ललित सोनार ,अभिषेक महाजन ,सागर बारी ,प्रतीक साळी,श्रावणी आवरगंड ,गोपाल ,चव्हाण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मंत्री – ओम गुरव
छत्रपती शिवाजी महाराज नगर मंत्री- गौरव पाचपोर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now