जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ठरला; यांची झाली निवड?

ऑगस्ट 29, 2025 4:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी आज दि २९ रोजी निवडणूक पार पडली. यामध्ये माजी उपमहापौर सुनील महाजन यांना १८ पैकी १५ मते मिळाल्याने ते विजयी झाले.

jalgaon krushi

काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे माजी सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत समितीतील राजकीय समीकरणे ढवळून काढली होती. मात्र, प्रस्तावावर चर्चा होण्याआधीच सोनवणे यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

सभापतीपदासाठी ठाकरे गटाचे सुनील महाजन तसेच मनोज चौधरी आणि लक्ष्मण पाटील यांनी अर्ज घेतले होते. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार) गोकुळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

मात्र, मनोज चौधरी यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सभापतीपदासाठी महाजन आणि पाटील यांच्यात थेट लढत रंगली. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले असता, महाजन यांना १५ आणि लक्ष्मण पाटील यांना अवघी दोनच मते मिळाली. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांना सभापती घोषित केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now