धोका वाढला ! जळगाव जिल्ह्यातील पावसाबद्दल IMD कडून मोठी अपडेट

ऑगस्ट 28, 2025 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत असून मागच्या दोन तीन दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातही अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून अशातच जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यातील पावसाबद्दल हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आलीय.

RN28

राज्यातील या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तविली आहे.

हवामान खात्याकडून हा अलर्ट जारी करताना राज्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरींसह वारे प्रतितास ४० ते ६० किमी वेगाने वाहणार असल्याचेही सांगण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहे. आज गुरुवारी दुपार १२च्या सुमारास जळगाव शहरासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हवामान खात्याने आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. २९ व ३० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता आहे. ३१ ऑगस्टपासून पाऊस ओसरेल. या काळात ऊन्ह-सावलीचा खेळ काही प्रमाणात सुरू राहिल. सोबतच तापमानात दोन ते तीन डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्टपासून उष्ण तापमान आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. १ ते ६ सप्टेंबरपर्यंत तापमानात वाढ होईल, त्यामुळे उकाडा सहन करावा लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now