गाय दूध खरेदीदरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ ; जळगावातील पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा

ऑगस्ट 28, 2025 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे गाय दूध खरेदीदरात प्रति लिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

milk

पशुपालक शेतकऱ्यांना आता ३.५ फॅट (स्निग्धांश) आणि ८.५ टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर ३५ रूपये खरेदीदर मिळणार आहे. त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन खरेदीदर अदा करण्यात यावे, असे गावोगावच्या प्राथमिक सहकारी दूध उत्पादक संस्थांना जिल्हा सहकारी संघाकडून सूचित करण्यात आले आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाचे खरेदीदर वाढवले असले, तरी म्हशीच्या दुधाचे खरेदीदर मात्र जैसे थे ठेवले आहेत.

सध्या म्हशीच्या ६.० फॅट (स्निग्धांश) आणि ९.० टक्के एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दुधाला प्रति लिटर आठ रूपये २५ पैसे खरेदीदर दिला जात आहे, असे जिल्हा दूध संघातील संकलन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

खरंतर पावसाळ्यात दूध संकलन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरेशा पोषक चाऱ्याचा अभाव. ज्यामुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटते.याचे जळगाव जिल्हा सहकारी संघाच्या दैनंदिन दूध संकलनावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सद्यःस्थितीत जळगाव दूध संघाचे दैनंदिन संकलन सुमारे दोन लाख १० हजार लिटरपर्यंत असून, त्या पैकी गायीचे दूध एक लाख ६० हजार लिटर आणि म्हशीचे दूध ५० हजार लिटरपर्यंत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now