जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली होती. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली असून भुसावळ रेल्वे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा शून्य क्रमांकाने शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

संशयितांपैकी दोन अल्पवयीन (१७ वर्षीय) आहेत. इतर तिघांची नावे अनुक्रमे युवराज हिंमत पवार (वय २२), प्रवीण मधुकर पवार (वय २२), नरेंद्र संतोष पवार (वय २२, रा. दराणे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) अशी आहेत.

गर्दीचा गैरफायदा घेत जनरल डब्यात काही तरुणांनी प्रवाशांना विशेषतः महिलांना त्रास दिला. वरणगाव स्थानकावर गाडी थांबल्यावर एका संशयिताने ट्रॅकवर उतरून अश्लील कृत्य केले.







