पाचोऱ्यात स्वदेशी जागरण मंचचे विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंच्या विरोधात अभियान

ऑगस्ट 26, 2025 5:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्यामार्फत पाचोरा शहरात आज विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबविण्यात आले. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे जळगाव जिल्हा सह संयोजक गिरीश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

swadeshi

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे, तालुका सहसंयोजक प्रवेश जैन, संदीप सराफ, संपर्कप्रमुख- भावेश पटेल, संदीप काळकर, तालुका संघचालक दिनेश अग्रवाल, तालुका जागरणप्रमुख राजूभाऊ बाळदकर, भाजप ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील, पाचोरा शहर प्रमुख दीपक माने, संदीप जैन, बंटी भाऊ महाजन, गजूभाऊ पाटील, अतुल पाटील व अनेक नागरिक उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करतांना श्री बर्वे म्हणाले की, विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकत स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. यात प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल, असे सांगत स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्थानिक व्यापारी व विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बाजार जायेंगे स्वदेशीही खरेदींगे, स्वदेशी अपणाओ- देश बचाओ या घोषणा देण्यात आल्या.

pc swadesh

त्यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. विदेशी वस्तूंना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियानाच्या माध्यमातून पाचोरा शहरात व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा आणि विद्यार्थी सहकार्याने जनजागृती करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now