शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’

ऑगस्ट 26, 2025 1:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । जळगावसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट येत्या काही दिवसात भरून निघण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आगामी दोन दिवस जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज २६ आणि उद्या २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

rain 1

जिल्ह्यात पावसासह ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातदेखील पावसाचे तीन ते चार वेळा टप्पे येऊ शकतात अशी शक्यता आहे.

दरम्यान यंदा अर्धा ऑगस्ट महिना संपल्यावरही पाऊस नसल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढल्या होत्या. १५ ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या तुलनेत केवळ १४ टक्के पाऊस झाला होता. मात्र १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे शेती पिकाचे व घरांचे नुकसान झाले. सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ सुरु असून अधून मधून जोरदार पाऊस कोसळत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सरासरीचा विचार केला तर जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर एक वेळेस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यत आला आहे. ऑगस्ट महिन्याचा विचार केला, तर हवामान विभागाचे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now