धक्कादायक ! महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेचा विनयभंग; शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यानची घटना

ऑगस्ट 26, 2025 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे राज्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच धावत्या रेल्वेत प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यात दोन अल्पवयीन आहेत.

crime train

युवराज हिम्मत पवार (२२), नरेंद्र संतोष पवार (२२) आणि प्रवीण मधुकर पवार (२१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी महिला पती आणि कुटुंबीयांसह शेगावहून जळगावकडे येण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवास करीत होती. यावेळी डब्यामध्ये प्रचंड गर्दी होती.

गर्दीचा फायदा घेत, वरील संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाइकांशी अश्लील वर्तन केले. या संशयितांनी फिर्यादी आणि तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्रास दिला. गाडी भुसावळ स्थानकात येताच,महिलेच्या नातेवाइकांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now