जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२५ । गणरायाचे आगमन बुधवारी दि २७ ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी राज्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. मात्र गणरायासोबतच राज्यात पावसाच्या आगमनाचीही शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे

राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा हा देण्यात आलाय. २६ ते २९ ऑगस्टदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मध्यम पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत मध्यम पाऊस असेल. तर नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मध्य प्रदेशमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. काही भागांमध्ये आज ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला.








