जळगाव जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस बरसणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज..

ऑगस्ट 22, 2025 2:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून सध्या अधून मधून पावसाच्या सरी बरसात आहे. आगामी काही दिवस जिल्ह्यात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता कमी असून मात्र त्यांनतर २७ ऑगस्टनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

rain 1 2 jpg webp

मोठ्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर जिल्ह्यातील काही तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नदी नाल्यांना पूर आला, तर अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले.

दिलासादायक म्हणजेच या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही धरणांनी शंभरी गाठली तर अनेक धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली. मात्र अनेक ठिकाणी खरीप पिकांना मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे पंचनामे करून भरपाईची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे. मात्र यातच हवामान खात्यानं शेतकऱ्याची टेन्शन वाढवणारा अंदाज वर्तविला आहे.

जिल्ह्यात २६ ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता कमी असून मात्र त्यांनतर २७ ऑगस्टनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. म्हणजेच जिल्ह्यात मात्र गणेशाच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी अधून मधून वाऱ्यासह पावसाच्या सरी बसरसत आहे. पावसामुळे तापमानात ३० पर्यंत असून वातावरणात गारवा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now