ब्लॉक संपल्यामुळे आजपासून भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरळीत

ऑगस्ट 17, 2025 9:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ । भुसावळ-भादली स्थानक दरम्यान इगतपुरी-भुसावळ रेल्वे मार्गावर नागपूर महामार्गावरील जुन्या पुलाच्या जागेवर नवीन रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (आरओबी) रुंदीकरणाचे काम झाले. या कामाअंतर्गत पाच स्टिल प्लेट गर्डरच्या लाँचिंगसाठी रेल्वेने सलग चार दिवसांचा ब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक शनिवारी (ता. १६) संपला. त्यामुळे आज रविवारपासून (ता. १७) या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या सुरळीत धावणार आहे.

new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

या ब्लॉक दरम्यान गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता. पहिल्या दिवशी काशी एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, ताप्ती गंगा एक्स्प्रेस तसेच भुसावळ-सुरत पॅसेंजर या गाड्यांना दोन ते अडीच तास विलंब झाला होता. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी काशी एक्स्प्रेस आणि ताप्ती गंगा एक्स्प्रेस एक ते दीड तास उशिराने धावल्या. शनिवारी ब्लॉकचा चौथा आणि शेवटचा दिवस होता.

ताप्ती गंगा एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेस या दोन गाड्यांना प्रत्येकी दीड तास उशीर झाला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी बीओटी तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम चार दिवसांच्या ब्लॉक दरम्यान पूर्ण करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now