डॉ.केतकी पाटलांच्या संकल्पनेतून निर्मिती “सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना” पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ऑगस्ट 12, 2025 6:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ‘सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना’ पुस्तिकेचे आज १२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे सह्याद्री शासकीय विश्राम गृह येथे आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा(विदर्भ तापी व कोकण खोरे) विकास मंडळ मंत्री ना. गिरीश महाजन, पर्यटन, खनिज कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभुराजे देसाई, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री ना. जयकुमार गोरे, उद्योग मंत्री ना.उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे आदीच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

book prakashan ketki tai

तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, आ. राजुमामा भोळे, आ. चैनसुख संचेती, आ.अमोल जावळे यांनी ही प्रकाशन करून कौतुक केले. आरोग्य दूत तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी पुस्तिके बद्दल अभिनंदन केले.

शासनाने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना आणलेले आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या व त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी यातील ठळक योजनांची माहिती असलेली पुस्तिका डॉ. केतकी ताई पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. केतकीताई यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now