नागपूर-पुणे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर जाहीर; जळगावहुन किती भाडे लागणार? असे आहेत भाडे..

ऑगस्ट 9, 2025 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२५ । वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांसाठी खुशखबर असून उद्या म्हणजेच १० ऑगस्ट रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या ट्रेनला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवी झेंडी दाखवतील. विशेष या गाडीला जळगाव भुसावळला थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

vande bharat express new photos jpg webp

दरम्यान काही दिवसापूर्वी या ट्रेनचे वेळेपत्रक जाहीर झाले होते. मात्र या वंदे भारतचे तिकीट दर जाहीर झाला नव्हते. मात्र आता नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस तिकीट दरही समोर आलेय. या अतिजलद रेल्वेत पुणे ते जळगाव चेअर कारचे भाडे १०२० रुपये तर एक्झिक्युटिव्ह कार २०३५ रुपये असेल. तर अजनी ते जळगाव चेअर कार ९४० रुपये व एक्झिक्युटिव्ह कार १८८० रुपये इतके असेल

उद्यापासून नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असून पहिल्या दिवशी ही गाडी नागपूर-पुणे ०१००१ या क्रमांकाने धावेल. नंतर ही गाडी २६१०१ (पुणे-अजनी) आणि २६१०२ (अजनी-पुणे) या क्रमांकाने धावणार आहे. रविवार दि. १० रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे दुपारी ३:५५ वाजता भुसावळात तर जळगावला ४:२६ वाजता आगमन होईल. या ट्रेनमुळे विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

असे असेल वंदे भारतचे भाडे

गाडी क्र. २६१०१ पुणे-अजनी चेअर कार- १५९५ रुपये
एक्झिक्युटिव्ह कार – ३१८५ रुपये पुणे ते जळगाव चेअर कार – १०२० रुपये
एक्झिक्युटिव्ह कार- २०३५ रुपये आहे. पुणे ते भुसावळ चेअर कारचे – १०७० रुपये
एक्झिक्युटिव्ह कार – २१३० रुपये
गाडी क्र. २६१०२ अजनी-पुणे
अजनी ते भुसावळ चेअर कार- ८९५ रुपये
एक्झिक्युटिव्ह कार – १७८५ रुपये.
अजनी ते जळगाव चेअर कार ९४० रुपये.
एक्झिक्युटिव्ह कार १८८० रुपये.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्राथमिक देखभाल आणि दुरुस्तीचे काम नागपूर येथे होणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी अजनीहून सोमवार वगळता आणि पुण्याहून मंगळवार वगळता सहा दिवस धावणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now