Amalner : प्रेयसीचा लग्नास नकार, इंस्टावर VIDEO पोस्ट करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल..

ऑगस्ट 7, 2025 2:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. इंस्टाग्राम वर व्हिडीओ पोस्ट करत तरुणाने गळ#$ फास घेत आत्म#$ हत्या केली आहे. गौरव बोरसे असं या तरुणाचे नाव असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

gaurav borse

गांधली (ता. अमळनेर) येथे वास्तव्यास असलेला गौरव बोरसे याने आत्म#$ हत्या केली आहे. आत्म#$ हत्या पूर्वी instagram वर त्याने व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

काय म्हटलं आहे व्हिडिओत?

त्यात गौरव म्हणाले की, मी एका तरुणी सोबत चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो, आम्ही लग्न देखील केले होते पण त्यावेळी आमचे वय कमी होते. आता मात्र त्या तरुणीने लग्नास नकार दिला आहे, तू मला विसरून जा असे ती सांगत आहे. चार वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर मला विसरून जा असे कशी काय सांगू शकते असा सवाल देखील या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे.

आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. असे देखील त्याने या व्हिडिओमधून म्हटले आहे. इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरव याने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now