सावदा येथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी पुकारले जनावर खरेदी-विक्री बंद आंदोलन!

जुलै 18, 2025 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । काही तथाकथित गोरक्षक व त्यांच्याशी निगडित इतर लोकांच्या माध्यमातून होत असलेले गैरवाजवी अन्याय अत्याचार मुळे जनावरांची खरेदी-विक्री सह त्यांची वाहतूकीचा मुद्दा दिवसेंदिवस अतिशय संवेदनशील स्वरुप धरत असून, यामुळे अनेक प्रकारचे वादविवाद,आर्थिक नुकसान,जिवितहानी सारख्या गंभीर गोष्टींना जनावरांचे व्यापारी व शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजाराचे पावत्या असून सुद्धा सतत तोंड द्यावे लागत असून,त्यांना शेवटी आरोपीच्या पिंजऱ्यात देखील उभे रहावे लागते.तरी या गैरप्रकारांना कंटाळून जो पर्यंत शासन तर्फे योग्य तो न्याय मिळणार नाही.तो पर्यंत सावदा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाजारात जनावरांची खरेदी-विक्री बंद आंदोलन दि.२० जुलै २०२५ रोजी पासून सावदा व परिसरातील सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी पुकारल्याचा ठाम निर्णय सामोहीक रित्या घेतला आहे.

faizpur

याबाबत त्यांनी सावदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना भेटून दि. १६ जुलै रोजी निवेदन दिले आहे. माहिती व कारवाई साठी सदर निवेदनाची प्रत जिल्हा न्यायाधीश जळगाव,पोलीस महासंचालक मुंबई,जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव यांना पाठवले आहे. सदर निवेदावर शेख रउफ शेख सलीम कुरैशी,पीर खान,शेख साबीर,शेख बिलाल कुरैशी,शेख रसूल शेख चांद,शेख जाकीर सह एकूण २७ लोकांच्या सह्या आहेत.

“तसेच सदर आंदोलनाच्या दरम्यानी काळात कोणी व्यापारी, कुरैशी बांधव यांनी जनावरांची खरेदी-विक्री केली.तर याबाबत पुराव्यानिशी माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल.व सदर व्यापरी किंवा कुरैशी बांधवला २५ हजार रुपये दंड असा निर्णय राज्य स्तरीय कुरैशी बिरादरीच्या वतीने घेण्याण्यात आल्या बद्दलची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now