सर्जनशीलतेतून केली साखरेच्या सेवनाबद्दल जागरूकता!

जुलै 15, 2025 4:58 PM

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विदयार्थ्यांची कल्पकता

gp15

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, विद्यार्थ्यांनी एका अनोख्या आणि अर्थपूर्ण शुगर बोर्ड अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेत सर्जनशिलतेतून जंक फूड आणि कोल्ड्रिंक्सच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.

यासाठी सजीव देखाव्याचे सादरीकरण,रंगीबेरंगी शुगर बोर्ड डिस्प्ले आणि विचार करायला लावणार्‍या स्कीटद्वारे विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता दाखवत जंक फूड आणि एरेटेड कोल्ड्रिंक्स आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात आणि यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, दात किडणे आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात याबाबत सादरीकरणाने एक संदेश दिला- “निरोगी अन्न हे जंक फूड न्हवे तर खरे ऊर्जा वाढविणारे आहे.!

“या घोषवाक्यासह उपक्रमातून विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याच्या सवयी स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. शाळेच्या प्रीन्सीपल अनघा पाटील यांनी विदयार्थ्यांच्या सर्जनशिलतेचे कौतुक केले या अनोख्या उपक्रमामूळे निश्चीतच लहानच नाही तर मोठयांना देखिल प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now