जळगाव-पुणे विमान अचानक रद्द; प्रवाशांमध्ये संतापाची लाट

जुलै 13, 2025 9:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जळगावहून पुण्याला जाणारे फ्लाय ९१ कंपनीचे विमान शनिवारी ऐनवेळी तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

plan fly

जळगावहुन पुण्याकडे जाणाऱ्या या विमानात अंदाजे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने अनेक प्रवाशांचे नियोजन बिघडले. ऐनवेळी विमानसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांच्या आनंदावर विरझन पडले आहे.

जळगाव विमानतळावरून दुपारी २.१५ वाजता सुटणारी फ्लाइट पुणे येथे ३ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. विमान सुटण्यापूर्वी सुरक्षेच्या पूर्तता केल्यानंतर बोर्डिंग पास घेऊन प्रवासी फ्लाइटमध्ये बसल्यानंतर कंपनीतर्फे विमानात तांत्रिक बिघाड झालेला असल्याने विमान उड्डाण भरणार नसल्याचे सांगण्यात आले. विमानात ५५ प्रवासी बसले होते. त्यांना विमान उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now