जळगाव जिल्ह्यात लाखो रुपयांची हातभट्टी जप्त ; १३४ गुन्हे नोंद

जुलै 10, 2025 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्टीद्वारे दारूची निर्मिती व विक्री सुरू असल्याच्या तक्रारीनुसार जिल्ह्यात एकत्रित धाडसत्र राबवण्यात आले. या राबवण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत जिल्हाभरात १३४ गुन्हे नोंदवण्यात आले.

New Project 1

यामध्ये ३,३८५ लिटर गावठी दारू आणि २०,१५० लिटर कच्चे रसायन (हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे) जप्त करण्यात आले. या मुददेमालाची एकूण किंमत १४,४८,६६२ रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलिस विभागाच्या वतीने एकूण ९९ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २,८४५ लिटर हातभट्टी दारू व ५,६३० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या मुददेमालाची किंमत सुमारे ६,१२,३८२ रूपये इतकी आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्हे नोंदवत ५४० लिटर गावठी दारू, १४,५२० लिटर रसायन आणि अवैध वाहतूक करणारे एक चारचाकी वाहन असा सुमारे ८,३६,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अधीक्षक व्ही. टी. भुकन, निरीक्षक डी. एम. चकोर (जळगाव), निरीक्षक अशोक तारु, भरारी पथक निरीक्षक मोमीन, चोपडा निरीक्षक किशोर गायकवाड, चाळीसगाव निरीक्षक राठोड, भुसावळ निरीक्षक यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी यांनी ही कारवाई पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now