⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | आदिवासी महिला कर्मचारीस मारहाण ; ‘त्या’ नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

आदिवासी महिला कर्मचारीस मारहाण ; ‘त्या’ नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ ।नंदुरबार येथे आदिवासी महिला कर्मचारी आपले कर्तव्या बजावत असतांना शिवीगाळ आणि मारहाण करणार्‍या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करुन संपत्तीची चौकशी करा अशा मागणीचे निवेदन भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य एरंडोलने प्रांताधिकारींना देवून निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हटलं आहे निवेदनात? 

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार येथील आदिवासी महिला कर्मचारी निशा पावरा या आपले कर्तव्य बजावत असतांना भारतीय जनता पार्टीचे गुंड प्रवृतीचे नगरसेवक गौरव चौधरी यांचा वाळुने भरलेला ओवरलोड ट्रक या महिला कर्मचारी यांनी अडवला असता गौरव चौधरी याने अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. ती घटना सोशल मिडीयावर देखील व्हायरल झालेली आहे. सदर महिला कर्मचारीस कर्तव्य बजावण्यापासुन पराववृत्त करणे, धमकी देणे, लज्जा येईल असे बोलणे व गैरवर्तन करणे, मारहाण करणे या गुन्ह्याबद्दल याचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच याची संपत्तीची चौकशी करण्यात  यांवी, अन्यथा भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटना आणि समस्त आदिवासी संघटनांकडून महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करण्यात येईल व काही घडल्यास शासन, प्रशासन जबाबदार राहील अशा इशारा देखील देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी प्रदेश उपाध्यक्ष रामलाल पवार, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा संघटक भोलानाथ महाले, महा ज्येष्ठ सल्लागार संजय पवार सर, सोशल मिडीया जिल्हाप्रमुख सागर वाघ, निहाल सोनवणे शंकर भोई, भैय्या मोरे शंकर बोरसे, आकाश अहिरे प्रविण सोनवणे, मधुकर सोनवणे, देवा वाघ, इच्छाराम सोनवणे. आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारींमार्फत मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार/जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.