राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त तीनशे विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वह्या वाटप

जून 1, 2025 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त कविरा ग्रुप तर्फे तांबापुरातील तीनशे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष पाटील शिवसेना महानगरप्रमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

vahya vatap

तसेच कविरा ग्रुप तर्फे मोफत लायब्ररीमध्ये गतवर्षी वीस मुलांची विविध ठिकाणी सरकारी विभागांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व पालकांची सत्कार करण्यात आले. कविरा ग्रुपचे अध्यक्ष अॅड सचिन हटकर यांच्याकडून धनगर समाजात सामूहिक विवाह सोहळा व मोफत लायब्ररी व शिक्षणाविषयी सामाजिक धोरण व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन शिक्षणाचा प्रसार केला जातो आणि धनगर समाज आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक बांधव शिवाजी कोपनर ,दीपक काळनोर, विनोद शिंदे,जिभाउ कोपनर,अशोक कोपनर,नाना पिसे ,राहुल माने, दादाभाई सुरंगे ,गोपाल लकडे ,जितू चोरमले ,आकाश मासाळ, नाना हटकर, विशाल सरक, मुकेश हटकर, ऋषी काळनोर, प्रवीण चोरमले ,विनोद हटकर, सागर चोरमले ,सोपान हटकर ,तुषार पाटील, अॅड योगेश पाटील,ॲड दिपक वाघ,ॲड अजय पाटील,श्रीकांत पाटील व कविरा ग्रुपचे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment