अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित जागर यात्रेचा डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात समारोप

मे 31, 2025 4:39 PM

रक्तदान करून अहिल्यादेवींनी तरुणांनी केले नमन

jagar yatra

जळगाव लाईव्ह न्यूज ।  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सकाळी जळगाव येथून भव्य जागर यात्रा काढण्यात आली. तीनशे किलोमीटर अंतर पार करून सायंकाळी ही यात्रा गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात पोहोचली. या ठिकाणी असलेल्या किवा तेवन मध्ये जागर यात्रेचा समारोप झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर विकास दूध फेडरेशनचे संचालक अरविंद दादा देशमुख, अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे सुभाष दादा सोनवणे, डॉ नरेंद्र शिरसाट, नानाभाऊ बोरसे, प्रभाकर न्याहळदे, रमेश सुलताने, दिलीप धनगर, संतोष दादा कचरे, सुभाष दादा करे, ऍड शरद न्याहाळदे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, अरुण ठाकरे, डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ प्रशांत वारके, तुळशीराम सोनवणे, ऍड ऋषीकेश सोनवणे उपस्थित होते.

ss

मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळशीराम सोनवणे यांनी केले तसेच अरविंद देशमुख आणि प्रमोद भिरुड यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली तसेच या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषण सुभाष दादा सोनवणे यांनी करून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरात डॉ उल्हास पाटील रक्तपेढी तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले

या प्रसंगी तरूणांनी रक्तदान करून राजमाता अहिल्यादेवींना नमन केले. या जागर यात्रेस डॉ केतकी ताई फौंडेशनचेही सहकार्य लाभले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या जागर यात्रेचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला. यावेळी परिसरात राष्ट्रभक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment