गर्भाशयाच्या फायब्रॉइडवर युएई तंत्रज्ञानाव्दारे यशस्वी उपचार

मे 29, 2025 4:59 PM

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांचे यश

UAE technology

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२५ । रूग्ण रामलीबाई बारेला वय ४३ बर्हाणपूर हिला मागील ७ ते ८ महिन्यापासून पोटात गोळा होता त्यामूळे प्रचंड पोटदुखी त्रास होत होता. तीच्या गर्भाशय फायब्रॅाइडवर रेडीओलॉजीस्टव्दारा युएई तंत्रज्ञानाव्दारे यशस्वी उपचार करण्यात आले.

ती रूग्णालयात आल्यानंतर सोनोग्राफी करण्यात आली यात गभाशयात १० बाय १२ बाय १३ से.मी गाठ असल्याचे लक्षात आले. याचबरोबर वारंवार रक्तस्त्राव देखिल होत असल्याने ही शस्त्रक्रिया किचकट होती. स्त्रीरोग तज्ञांनी रेडीओलॉजीस्टची मदत घेण्याचे ठरवले.यावेळी युएई म्हणजे गर्भाशय धमनी एम्बोलॉयझेशन हे तंत्र उपयोगात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यात जेलफोम टाकून रक्तप्रवाह थांबवला जावू शकतो तसेच शस्त्रक्रियेच्या दरम्यान रक्तस्त्राव होण्याचा धोका कमी होतो. रेडीओलॉजीचे प्रमुख डॉ. किरण पाटील आणि डॉ. गित कटारीया यांनी ही प्रक्रीया यशस्वीपणे राबवली यानंतर लगेचच दुस या दिवशी स्त्रीरोग तज्ञ डॉ माया आर्विकर, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, यांचे मार्गदर्शनानुसार डॉ हंसिया, डॉॅ अनुजा चलाख यांनी सिझर पध्दतीने गर्भपिशवी व ही गाठ काढली. भुलरोग तज्ञ डॉ महाजन, डॉ प्रितम सोनवणे यांनी सहकार्य केले.

काय आहे युएई तंत्रज्ञान – ही गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी एक कमीत कमी आक्रमक प्रक्रिया आहे. यामध्ये गर्भाशयाच्या धमन्यांमध्ये लहान कण घालून फायब्रॉइड्सना रक्तपुरवठा रोखला जातो, ज्यामुळे त्यांचा आकार कमी होतो आणि लक्षणे कमी होतात. युएई दरम्यान, रेडिओलॉजिस्ट गर्भाशयाच्या धमन्यांमध्ये कॅथेटर घालतो आणि लहान कण (सामान्यतः पॉलीव्हिनाइल अल्कोहोल किंवा तत्सम पदार्थांपासून बनलेले) सोडतो जे फायब्रॉइड्समध्ये रक्त प्रवाह रोखतात. यामुळे कालांतराने ते आकुंचन पावतात, ज्यामुळे मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना यासारख्या लक्षणांपासून आराम मिळतो असे डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

रूग्ण आला तेव्हा अत्यावस्थेतच आला अशातच सतत रक्तस्त्रावाची समस्या असल्याने शस्त्रक्रिया करून गाठ काढतांना रक्तस्त्राव होवून दगावण्याची शक्यता असल्याने रेडीओलॉजीस्टच्या मदतीने युएई तंत्रज्ञानाने उपचार झाल्यानंतर दुसर्या दिवशीच गाठ काढली त्यामूळे यश मिळाले
– डॉ. हंसिया पिल्लई, निवासी स्त्रिरोग तज्ञ

आम्ही गरीब लोक पण या रूग्णालयाने अत्याधुनिक उपचार आयुष्यमान योजनेत मोफत करून दिल्याने रूग्णांचे प्राण वाचल्याची भावना नातेवाइंकानी बोलून दाखवली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment