दुचाकीवरून २० लाखांचा गांजा वाहून नेणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मे 28, 2025 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चुंचाळे रोडवर चोपडा पोलिसांनी दुचाकीवरून तब्बल २० लाख रुपयांचा गांजा वाहून नेणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. कालूसिंग गोराशा बरेला (वय २६, रा. महादेव, ता. शिरपूर, जि. धुळे) असं अटक केलेल्या या तरुणाचे नाव आहे.

crime 2 jpg webp

याबाबत असे की, चोपडा तालुक्यातून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार चुंचाळे रोडवर पोलीस पथकाने सापळा रचला. या सापळ्यात एका संशयित मोटारसायकलस्वाराला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे १० किलो ६०० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित गांजा आढळून आला. पोलिसांनी कालूसिंग गोराशा बरेला याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गांजा, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील या पथकाने ही कारवाई पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment