प्रतीक्षा संपली! मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री, जळगावात कधी दाखल होणार? वाचा बातमी..

मे 26, 2025 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी असून मान्सूनने केरळनंतर आता महाराष्ट्रात एंट्री घेतली आहे. भारतीय हवामान खात्याकडून यंदा मान्सून २७ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नैऋत्य मान्सून २४ रोजी केरळात तर काल २५ मे रोजीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला.

monsoon jpg webp

दरवर्षी मान्सून साधारणपणे ७ जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा सामान्य वेळेपेक्षा मान्सून १२ ते १४ दिवस आधीच महाराष्ट्रातील कोकणात दाखल झाला आहे. आता यानंतर जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे कधी आगमन होणार याची जळगावकरांसह शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. अशातच मान्सून जळगावात ३१ मे ते ४ जून या कालावधीत दाखल होण्याचा अंदाज आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावू शकतो. तर सोमवारी शहरात रिमझिम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज स्थानिक हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

सध्या अरबी समुद्रात कोकण-गोवा किनारपट्टीजवळ एक निम्न दाब क्षेत्र सक्रिय झाले आहे. जे रविवारपर्यंत (२५ मे) अवदाबात (डिप्रेशन) तीव्र झाले आहे. या प्रणालीने बाष्पयुक्त वारे आणि ढग तयार करण्यास मदत केल्यामुळे मान्सूनचा प्रवाह वेगाने पुढे सरकतो आहे. या निम्न दाब क्षेत्राने मान्सूनला लवकर बळ दिले व कोकणात २५ मे रोजी मान्सून दाखल झाला. दुसरे कारण असे की हिंद महासागरमधील द्विध्रुव स्थितीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात समुद्र पृष्ठभागाचे तापमान वाढते आहे. ज्यामुळे मान्सून लवकर सक्रिय होतो आहे. सन २०२५ मध्ये सकारात्मक पावसाची शक्यता असू शकते.

दरम्यान, आता कोकणात दाखल झालेला मान्सून जळगाव जिल्ह्यात कधी दाखल याची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याकडून जळगावमध्ये मान्सून दाखलची अधिकृत घोषणा झाली नसली तरी ३१ मे ते ४ जून या कालावधीत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

जळगावात आज कसे राहणार हवामान?
हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला आगामी दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जाणारी केला आहे. आज जिल्ह्यात रिपरिप पावसाची शक्यता आहे. मात्र आगामी दिवसात जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.काल रविवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते, तसेच काही प्रमाणात वारेही वाहत असल्याने, जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

Image

ऑक्टोबरपर्यंत पावसाळा
यावर्षी सकारात्मक आयओडी (बिद्रुव) आणि ऑगस्टमध्ये संभाव्य ला-निना यामुळे पावसाळा सप्टेंबरच्या शेवटपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत टिकण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तो सामान्य कालावधीतच संपेल. लवकर आगमनामुळे पावसाचे प्रमाण जास्त किंवा अनियमित होऊ शकते, पण लवकर संपण्याची शक्यता कमी आहे, आहे अशी माहिती हवामान अभ्यासक यांच्याकडून देण्यात आली

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment