मनशक्ती चे 5 दिवसांचे विनामूल्य उन्हाळी संस्कार शिबिर उत्साहात

मे 24, 2025 8:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२५ । मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा प्रेरीत जळगांव केंद्रातर्फे दिनांक 20 ते 24 मे 2025 या कालावधीत 6 ते 14 वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यासाठी रोज सकाळी 8 ते 10 असे संस्कार शिबिर घेण्यात आले. यात मनशक्ती ची प्राथमिक माहिती, पाठांतराची गंमत गाणी मुलांना शिकवली.जीवनात ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता चे महत्व सांगितलेब, त्याचे प्रात्यक्षिक म्हणून एक मिनिटाचा एकाग्रतेचा गेम घेण्यात आला.ज्योती ध्यान एकाग्रता का व कशी करावी हे समजावून सांगितले.प्रार्थनेचे महत्व समजावण्यात आले.

summer shibir

तसेच मुलांनी आई वडिलांसाठी प्रार्थना का करावयाची हे सांगितले व रोज प्रार्थना घेण्यात आली. गायत्री मंत्राचा अर्थ समजावून रोज 12 वेळा गायत्री मंत्र घेण्यात आला. मुलांचे मैदानी खेळ घेण्यात आले. मूल्य शिक्षणाच्या बोधपर गोष्टी घेण्यात सांगितल्या. आई वडिलांच्या प्रति कृतज्ञता व नमस्काराचे महत्व व त्यातील विज्ञान मुलांना समजून सांगितले कृतज्ञता कार्ड ही अँक्टिव्हिटी मुलांकडून करवून घेतली पालकांसाठी सरप्राइस होते. आजकाल विस्मरणात गेलेला खेळ म्हणजे माझ्या मामाचे पत्र हरवले हा खेळ सर्वांनी आवडीने खेळला मोबाईल व टीव्ही च्या जमान्यात विशेष म्हणजे अनेकांना हा खेळ नवीन होता. आपले आरोग्य या अतंर्गत डॉ प्रभात पांडे यांनी दातांची निगा याविषयावर मुलांशी इंटर ऍक्टिव्ह संवाद साधला मुलांच्या प्रश्नांचे/ शंकांचे निरसन केले.

एक दिवस बगीच्या मध्ये अंगत /पंगत करून मस्त स्वादिष्ट भेळ बनवून प्रार्थना म्हणून (वदनी कवळ घेता) भेळ चा स्वाद मुलानी घेतला. मुलांना अभ्यास यशाच्या युक्त्या या पाठात बुद्धीवर्धन पद्धत, मेंदू व्यायाम, पिरोब्रेन एकाग्रता, स्टिकर याची सविस्तर माहिती देण्यात आली. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात 36 मुलांनी सहभाग नोंदवला. हा उपक्रम खूपच उत्कृष्ट झाला.शेवटच्या दिवशी पालकांसाठी एक सत्र घेण्यात आले मुलांच्या यशात पालकांचा सहभाग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यात 60 विद्यार्थी व 60 पालक यांनी सहभाग नोंदवला .या शिबिराच्या यशस्वीते साठी मनशक्ती साधक परिवाराने परिश्रम घेतले .या उपक्रमसाठी केमिस्ट भवन विनामूल्य उपलब्ध झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment