जळगाव जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

मे 20, 2025 4:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ हरभरा खारेदी करीता जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड ,जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळिसगाव या तालुक्यांमध्ये एकूण १६ हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

harbhara jpg webp

हरभरा
हमीभाव- ५६५० रुपये
शेतकरी नोंदणी मुदतवाढ- दि. ३०/०५/२०२५
खरेदी कालावधी- दि.०१/०४/२०२५ ते २९/०६/२०२५

शेतकऱ्यांनी हरभरा नोंदणी आणि खरेदीचा लाभ घ्यावा व ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि ऑनलाइन पोकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्याक्ष रोहित दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार तसेच जिल्हा पणन अधिकारी एस.एस.मेने यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment