जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ”स्वच्छता पुरस्कार 2025” उपक्रम

मे 18, 2025 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एस.डी. फाउंडेशन आणि आरोग्य भारती जळगाव यांच्या वतीने महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या प्रायोजकत्वाखाली स्वच्छता पुरस्कार 2025 या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. हा उपक्रमकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती आणि स्वच्छ, हिरव्या समाजाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे हा उद्देश बाळगून राबवला जात आहे.

award

हा कार्यक्रम स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उद्योग, बाजारपेठा, रुग्णालये, बँका यांचा सन्मान आणि प्रोत्साहन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमची नोंदणीची सुरुवात १ मे पासून सुरु झाली आहे. नोंदणी व सहभागाची अंतिम तारीख १५ मे तर मूल्यमापन कालावधी १६ मे २०२५ ते ३० मे २०२५ दरम्यान आहे.

पुरस्कार जाहीर व वितरण समारंभ ५ जून २०२५ रोजी जळगाव शहरातील रोटरी भवन, मायादेवी नगर येथे सायंकाळी ५ ते ८ दरम्यान कार्यक्रम पार पडणार असून प्रत्येक क्षेत्रात तीन पुरस्कार दिले जातील. अधिक माहितीसाठी ९१ ८९८३४५१५२१, +९१ ९१५२८२१९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सहभागी का व्हावे?
आपल्या पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव दाखवा
इतरांना शाश्वततेच्या दिशेने प्रेरणा द्या
कचरा व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचे संकलन, स्वच्छता उपाय योजना यासारख्या उपक्रमांसाठी सन्मान मिळवा
आपल्या शहराच्या स्वच्छ, आरोग्यदायी आणि हिरव्या भविष्याच्या मोहिमेचा भाग बना

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment