12वीच्या गुणपत्रिकांचे वाटप १६ मे पासून

मे 14, 2025 2:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.

student

या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रे व तपशीलवार गुणपत्रकांचे शालेय अभिलेख दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजता संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जातील. या अनुषंगाने सर्व प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव श्री. देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment