जळगावात रेल्वे अपघात होता होता टळला ; मध्यरात्री रुळांच्या मधोमध ठेवले दगड

मे 6, 2025 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२५ । जळगाव पाचोरा दरम्यानच्या म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जिथे मोठा रेल्वे अपघात होता होता टळला आहे. रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे रुळांवर आणि रुळांच्या मधोमध दगड ठेवण्यात आले होते. ही संपूर्ण घटना वेळेत लक्षात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

mhasavad

काय आहे प्रकार?
म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी दररोजच्या तपासणीदरम्यान रुळांवर दगड आढळल्याचे लक्षात घेतले. हे दगड केवळ रुळांच्या बाजूला नव्हते, तर थेट दोन रुळांमध्ये अडकवले गेले होते. हे पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वेच्या यंत्रणांनी तत्काळ या भागातील संपूर्ण रुळांची तपासणी करून दगड हटवले आणि अपघात टाळण्यात यश मिळवलं.

दरम्यान, हा प्रकार घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा उद्देश काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार अपघात घडवण्यासाठी मुद्दाम केला होता का? की केवळ खोडसाळपणातून कोणी असं कृत्य केलं? याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment