दुर्दैवी! बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

मे 4, 2025 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी नजीक असलेल्या नांदगाव तांडा (ता. सोयगाव) येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या तीनपैकी दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला; तर तिसऱ्याला वाचविण्यात यश आले. मृतांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या भाच्याचाही समावेश आहे.

budun mrutue jpg webp

अकील शकील पठाण (वय १८, रा. नांदगाव तांडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि रेहान भिकन शेख (१५, रा. सुरत) अशी मृत मुलांची नावे आहेत. साकिब कलंदर पठाण (१३, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) याला मनीषा कैलास बागूल (१८) या तरुणीने आपला जीव धोक्यात घालून वाचवले.

रेहान हा नांदगाव तांडा येथे मामा शकील पठाण याच्याकडे आला होता; तर वाचलेला साकीब हा बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला आहे. शनिवारी दपारी हे तीनही जण बैल धुण्यासाठी नांदगाव तांड तलावाकडे गेले. पाण्याचा अंदाज आल्यामुळे तिघेही पाण्यात बडाले.

तलावात उतरलेले तीनही मुले बुडत असल्याची बाब तलावात कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच त्यांतील मनीषा बागूल या तरुणीने कसलाही विचार न करता थेट तलावात उडी घेतली. यात तिला साकीब याला वाचविण्यात यश आले. ग्रामस्थांनी अकील पठाण व रेहान शेख यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पाण्यातून वाचलेल्या साकीब पठाण याच्यावर पाचोरा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment