बाबो! जळगावातील वृद्ध महिला वकिलाला लावला ७५ लाखाचा चुना, अशी केली फसवणूक?

मे 4, 2025 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असून अशीच एक घटना जळगावात घडलीय. ज्यात संगनमताने कट रचून भूमिरत्नम रियल इस्टेट प्रा. लि. नावाची शेल कंपनी तयार करून ६५ वर्षीय वृद्ध महिला वकिलाची ७५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात मनीष सतीश जैनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील तिघांना अटक करून कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

fraud jpg webp

अॅड. शिरीन गुलाम अली अमरेलीवाला (वय ६५, रा. शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार मनीष सतीश जैन (वय ४९, रा. यश प्लाझा), अतुल सतीश जैन (वय ५०), यशोमती सतीश जैन, जाफर खान मजिद खान (रा. सुप्रीम कॉलनी), विजय इंद्रचंद ललवाणी (रा. सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा. गोलाणी) व केतन किशोर काबरा (रा. ओंकारेश्वर मंदिराजवळ, जयनगर) यांच्या विरुद्ध शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. त्यात या सात जणांनी संगनमत करून बनावट शेल कंपनीत ७५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्या बदल्यात व्याज देण्याचे व मुंबईत फ्लॅट देण्याचे सांगितले होते. सुरुवातीला नफ्याची रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे दिले नाहीत. या तक्रारीचा आर्थिक गुन्हा शाखेतर्फे तपास केल्यानंतर अमरेलीवाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १ मे रोजी रात्री ८ वाजता मनीष सतीश जैन, अतुल सतीश जैन व विजय इंद्रचंद ललवाणी या तिघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना कोटनि सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment