जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. कारण [IBPS] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध पदांची मेगा भरती निघाली आहे. तब्बल १० हजार ४६६ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे.
या भरतीबाबत अधिक तपशील जाणून घ्या…
पदाचे नाव व जागा :
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 27
7) ऑफिसर स्केल-II (CA) 32
8) ऑफिसर स्केल-II (IT) 59
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
या भरतीसाठी 01 जून 2021 रोजी कमीत कमी वय १८ ते जास्तीत जास्त ४० वर्षापर्यंत असावे. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट राहणार.
परीक्षा शुल्क:
यासाठी जनरल आणि ओबीसीसाठी ८५०/- रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. तर SC/ST/PWD/माजी सैनिक यांना १७५/- रुपये इतके परीक्षा शुल्क असणार.
परीक्षा:
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
या भरतीबाबतची जाहिरात (Notification) : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा