डांभुर्णी ग्रा.पं.च्या विद्यमान सरपंच सौ. कविता सोळंके यांचं निधन

जून 10, 2021 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । यावल तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. कविता समाधान सोळंके (वय ३२) यांचे काल बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.  त्यांचे टाटा हॉस्पीटल मुंबई येथे उपचार सुरू होते.

kavita solanke

कविता सोळंके यांची सप्टेंबर २०२०मध्ये  डांभुर्णी ग्राम पंचायतच्या सरपंचपदी निवड झाली होती. त्यांच्या सरपंचपदाच्या अल्पशा कालावधीत सौ. कविता सोळंके यांनी अत्यंत प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. त्या विदगावच्या माहेरवासी होत्या त्यांच्या निधनामुळे विदगाव आणी डांभुर्णि या गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पती समाधान कोळी,  दोन वर्षाचा मुलगा सासु, सासरे, जेठ असा परिवार आहे. सरपंच सौ. कविता सोळंके यांच्या अशा दुदैवी निधनाबद्दल सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा डांभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरूजीत चौधरी यांनी आपल्या शोकसवेदना व्यक्त केल्या. आपण शब्द पाळणारे एकनिष्ठ व विश्वासु सहकार्यास मुकलो असल्याची त्यांनी म्हटले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now