जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२५ । होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे. यातच मध्य रेल्वेनं मुंबई ते बनारस, पुणे ते दानापूर, एलटीटी दानापूर, मुंबई ते महू अशा चार अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना जळगाव आणि भुसावळला थांबा असेल .

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बनारस (01013/14) होळी विशेष गाडी १३ मार्चला रात्री १०.३० वाजता मुंबई येथून सुटेल. बनारसला तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात १५ रोजी सकाळी ८ वाजता बनारस येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबईला पोहोचेल. पुणे एलटीटी गाडी ११ मार्चला रात्री ७.५५ला पुणे येथून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १३ रोजी सकाळी ६.३० वाजता दानापूर येथून निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३५ ला पुणे येथे पोहोचेल.
एलटीटी – दानापुर (01011/12) गाडी १० रोजी सकाळी १०.३० वाजता एलटीटी येथून निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ११ रोजी रात्री ९.३० वाजता दानापूर येथून निघून तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता एलटीटीला येईल. मुंबई ते मऊ (01015/16) गाडी १२ रोजी रात्री १०.३० वाजता सुटून महू येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास १४ मार्चला महू येथून सायंकाळी ५ वाजता सुरू होईल.