सद्गुरू कृपा मंडळ व नाथ संप्रदाय मंडळ जारगाव ता पाचोरा या संस्थेने 25 वर्षपासून कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो यावर संशोधन सुरू केलेल आहे. या कार्यक्रमाचे बॅनर कमळगाव ता चोपडा येथे लावून आयोजन करण्यात आले.
सदर उपस्थितांना सदगुरू हरिनाथ धुडकू महाराज जारगाव ता पाचोरा यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी कमळगाव येथे बुधवार दि. जून 2021 रोजी मारुती मंदीर चौकात सद्गुरू सेवा मंडळातर्फे माझे गाव सुरक्षित गाव या अभियानाचा शुभारंभ ग्राम पंचायत कमळगाव येथील सरपंच रोहित साळुंकेयांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व सद्गुरू कृपा मंडळ व ग्रामपंचायत सदस्य कमळगाव उपस्थित होते.