जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । बैलगाडीवर वीज कोसळल्याने १० जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी रावेर तालुक्यातील जिन्सी या आदिवासी भागात घडली आहे. जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत असे की, रावेर तालुक्यात बहुतेक भावात आज विजांच्या कडकडाट पावसाच्या सरी कोसळल्या. यात तालुक्यातील जिन्सी या आदिवासी भागात आज बुधवारी दुपारी शेतामधून बैलगाडीवर घरी जात असताना अचानक वीज कोसळली. यात १० जण जखमी झाले. त्यात बळीराम दल्लू पवार (वय-२१), दिलीप लक्ष्मण पवार (वय-२१), अरविंद साईराम पवार (वय-१५), ईश्वर दल्लू पवार (वय-१५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०), अनिल लक्ष्मण पवार (वय-२७), बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०), साईराम मोरसिंग पवार (वय-३७), मलखान मोरसिंग पवार (वय-४५) आणि लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५) रा. जिन्सी ता. रावेर यांचा समावेश आहे.
दरम्यान, जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट घेवून जखमींची विचारपुस केली. किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी सांगितले.