जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । आज बुधवारी जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काल सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रम ११० रुपयाची घट झाली असता आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम ११० रुपयाने वाढले आहे, तर चांदी देखील मागील वाढ झालीय. चांदीच्या दरात ५०० रुपयाची वाढ झाली आहे.
निर्बंध शिथिल होताच चांदीच्या वाढ होतानाचे दिसून येत आहे. त्यामुळे चांदीचा भाव ७६ हजारांच्या पुढे गेले आहे. तर सोनेदेखील ५० हजारांच्या दिशेने जात आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७१३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,१३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
मागील गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येत आहे. आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा १ किलोचा भाव ७६,६०० रुपये आहे. काल चांदीच्या भावात तब्बल ४५०० रुपयाची वाढ झाली होती.