⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आजपासून एसटीचेही अनलॉक; ४० गाड्यांचे आगाराचे नियोजन

आजपासून एसटीचेही अनलॉक; ४० गाड्यांचे आगाराचे नियोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जून २०२१ । कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्राची लाईफलाईन एसटी बस सेवा सर्वसामन्यांसाठी बंद आहे. एसटीच्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फेऱ्या सुरू हाेत्या.

दरम्यान, शासन निर्णयानुसार ७ जूनपासून महाराष्ट्र अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने जळगाव आगाराने देखील ४० फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोमवारपासून ग्रामीण मुक्काम, शालेय वाहतूक, जळगाव आगाराची शहरी वाहतूक व मानव विकास वगळता लांब पल्ला, मध्यम पल्ला, शटल सेवा वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत असल्याचे आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने अनलॉकची प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे सर्वत्र नवचैतन्य आले आहे. लॉकडाऊनमुळे एसटीच्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फेऱ्या सुरू हाेत्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.