जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांसह शहरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मान्सून काल गुरुवारी केरळात दाखल झाला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात विजांच्या विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1446491269017536