जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२१ । शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या विवाहितेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका अज्ञात व्यक्तीने विवाहितेच्या मैत्रिणींशी अश्लील चॅटिंग करून तिची बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश्वर नगरात राहणाऱ्या एका विवाहितेच्या फोटोचा आणि नावाचा उपयोग करून एका अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामचे फेक अकाउंट तयार केले. आरोपीने त्या अकाउंटवरून फिर्यादी विवाहितेच्या मैत्रिणींशी बदनामीकारक चॅटिंग केली. दि.२६ मे पासून सुरू असलेला प्रकार दि.३ जून रोजी लक्षात आल्याने याबाबत सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.