⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | …अखेर वैजनाथ वाळू गट शासनाकडे जमा

…अखेर वैजनाथ वाळू गट शासनाकडे जमा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । एरंडोल तालुक्यातील वैजनाथच्या वाळू ठेक्याबाबत ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, हा वाळू गट ठेकेदाराने पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. याबाबत बुधवारी ठेकेदाराने जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.

वैजनाथ गटातील १४२८ ब्रास वाळूचा लिलाव श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.तर्फे आदित्य श्रीराम खटोड यांनी निविदा भरून घेतलेला होता. या वाळू गटातील वाळू उपशाबाबत अॅड. विजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

उपजिल्हाधिकारी भारदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, उपअधीक्षक भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ भूवैज्ञानिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ६ दिवसांपूर्वी या वाळू गटाची मोजणी केली. या वाळू गटातून मर्यादेपेक्षा अडीचशे ब्रास अवैधरीत्या वाळू उपसा केल्याचे मोजणीत आढळून आले; मात्र ती मोजणी ठेकेदारासह तक्रारदाराने अमान्य केली आहे. त्यामुळे आता आधुनिक पद्धतीने या वाळू गटाची मोजणी होणार आहे. दरम्यान, टाकरखेडा हा वाळू गट अद्याप प्रशासनाकडे जमा केलेला नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.