जळगाव जिल्हा
मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२५ । पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणातील अद्वितीय योगदानाचे स्मरण करून, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी महत्वपूर्ण कार्य केले, ज्यामुळे भारतीय समाजात शिक्षणक्रांतीची सुरुवात झाली असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.