बातम्याराष्ट्रीयवाणिज्य

कोणालाही सोडले जाणार नाही! 1 जानेवारीपासून वाहतूक नियमांमध्ये मोठा बदल, काय आहेत घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२४ । थोड्यावेळात आपण नवीन वर्षाचे म्हणजेच 2025 चे स्वागत करणार आहोत. १ जानेवारीला लोक जल्लोषात तल्लीन झालेले पाहायला मिळतील. दरम्यान, नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्यात एक म्हणजे वाहतूक नियमांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कोणत्याही वाहनचालकाने नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला केवळ मोठा दंडच नाही तर तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

जाणून घ्या काय आहे नवीन वाहतूक नियम
ज्या वाहतूक नियमांबद्दल बोलत आहोत ते आपत्कालीन वाहनांशी संबंधित आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे आता आपत्कालीन वाहनाला रस्ता न दिल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आपत्कालीन वाहनांना मार्ग देता यावा यासाठी सरकारने हा नियम केला आहे. जर तुम्हाला आपत्कालीन वाहनांना रस्ता न देण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. यासाठी तुम्हाला केवळ मोठा दंडच नाही तर तुरुंगात जावे लागू शकते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या देशात रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना आपत्कालीन वाहन म्हणून पाहिले जाते. परंतु काही लोक आपत्कालीन वाहनांना रस्ता देत नाहीत. हॉर्न आणि सायरन वाजवूनही लोक आपत्कालीन वाहनांना रस्ता देण्यास टाळाटाळ करतात.

१ जानेवारीपासून सावधपणे वाहन चालवा
रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लवकरात लवकर मार्ग मिळावा आणि गंभीर जखमी किंवा आजारी व्यक्तींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सरकारने हा नियम केला आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा आपत्कालीन वाहनाचा हॉर्न वाजतो तेव्हा तुम्ही विलंब न करता त्यांना रस्ता द्यावा हेच योग्य ठरेल. म्हणूनच, आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हीही 1 जानेवारीपासून अशाच प्रकारे निष्काळजीपणे वागलात तर तुम्हालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button